जयसिंगपूर / ताः ३
शिरोळ तालुक्यातील आरोग्य विभागाला शिरोळ तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेकडून दहा ऑक्सीजन सिलेंडर किट भेट स्वरूपात देऊन संघटनेने मोठी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे . आरोग्य विभागाची गरज लक्षात घेऊन आणखी दहा ऑक्सीजन सिलेंडरचे किट या धान्य दुकानदार यांच्याकडून आरोग्य विभागाला दिले जाणार आहे . त्यामुळे रास्त भाव धान्य दुकानदारांनी संकटाच्या काळात सरकारला केलेली मदत ही मोलाची असल्याने शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांचे आभार मानत असल्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले . उदगांव येथील कुंजवन मधील कोवीड केअर सेंटर येथे झालेल्या समारंभप्रसंगी राज्यमंत्री यड्रावकर बोलत होते .

कोरोनाच्या महामारीमुळे साऱ्या जगासमोर कधी नव्हते . एवढे भयानक संकट उभे आहे . साथ कधी आटोक्यात येते . याचे आज तरी कोणाजवळ उत्तर नाही . जगातील अनेक संशोधक यासाठी प्रयत्न करीत आहेत . शासन आपल्या परीने सर्व प्रयत्न करीत आहे . सामान्य माणसाबरोबरच राज्य शासनासमोर सुद्धा आर्थिक अडचणीचे संकट उभे आहे . संकटाच्या काळात मदतीसाठी येणारे हात अनेक आहेत . अशा सर्व घटकांचे शासन ऋणी आहे . असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी सांगितले .
तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांनी रास्त भाव धान्य दुकानदारांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले . कार्यक्रमास कॉम्रेड चंद्रकांत यादव, रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे, उपाध्यक्ष आबू बारगीर, शिरोळ तालुका अध्यक्ष महादेव कदम, जितेंद्र गुप्ता, इमतियाज पठाण, सुरेश संकपाळ, सतीश कदम, अरुण संकपाळ, राजेंद्र घोडके, कुमार भिर्डे, गजानन हवालदार, नरसिंहवाडीचे उपसरपंच कृष्णा गवंडी, गजानन हावलदार, पुरवठा निरीक्षक अरुण माळगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .