जयसिंगपूर नगरपरिषद व आरोग्य विभागाकडुन घरोघरी आरोग्य सर्वेक्षण सुरु -उपनगराध्यक्ष संजय पाटील

जयसिंगपूर /ताः ३१

        कोरोना रूग्णांच्या संख्येत जयसिंगपूर शहर व परिसरात होत असलेल्या वाढीमुळे गुरुवारी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जयसिंगपुर नगरपरिषदेमध्ये सर्व संबंधितांची आढावा बैठक घेऊन प्रशासनाला आवश्यक उपाय योजना व कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना दिल्या त्याच पार्श्वभूमीवर शासनाच्या आरोग्य विभाग व जयसिंगपूर नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने जयसिंगपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले .

  जयसिंगपूर नगरपरिषद व आरोग्य विभागाकडुन घरोघरी जावुन आरोग्य सर्वेक्षण करताना कोरोना योद्धे

      असल्याची माहिती उपनगराध्यक्ष संजय पाटील -यड्रावकर यांनी दिली . आरोग्य राज्यमंत्री नाम . यड्रावकर यांनी प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे -धुमाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ . दातार, जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ . खटावकर, मुख्याधिकारी टीना गवळी, यांच्यासह जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा निता माने , उपनगराध्यक्ष व सर्व संबंधितांची बैठक घेऊन शहराच्या सर्व भागात तातडीने नागरिकांच्या घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्या बाबतच्या सूचना दिल्या होत्या . गरज भासल्यास खाजगी डॉक्‍टरांची सुध्दा मदत घ्यावी . असेही सुचवले होते, याचाच भाग म्हणून नाम . यड्रावकर यांच्या आढावा बैठकीनंतर मुख्याधिकारी टीना गवळी, तसेच उपस्थित नगरसेवक, जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. खटावकर यांची नियोजनाबाबतची बैठक घेऊन आरोग्य सर्वेक्षण बाबतचे नियोजन गुरुवारीच दिवसभरात पूर्ण केले असल्याचे संजय यड्रावकर यांनी सांगितले,
संपूर्ण जयसिंगपूर शहरामध्ये येत्या आठवड्याभरात नागरिकांच्या आरोग्य सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले जाईल . यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकडील पथकाला स्थानिक डॉ. सतीश पाटील, डॉ. प्रवीण जैन व डॉ. हिरेमठ यांनी केलेल्या विनंतीवरून दहा तज्ञ लोकांची मदत दिली आहे, सर्वेक्षण करणाऱ्या या पथका मधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे हेतूने पी. पी. ई. किट व अन्य उपकरणांची तातडीने २५० पी. पी. ई. किट,१५ थर्मल स्कॅनर,१५ पल्स ऑक्सीमायटर तातडीने नगरपरिषदेला उपलब्ध करून दिले . अशी माहिती उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी यावेळी दिली,
मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांच्या देखरेखीखाली व जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. दातार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथकाने काम सुरु केले असून संबंधित आरोग्य सर्वेक्षण पथकाकडून घरोघरी जाऊन संशयित रुग्ण, व्याधीग्रस्त रुग्ण, सर्दी पडसे अशी लक्षणे असणारे रुग्ण या सर्वांची वर्गवारी करून आवश्यक त्या ठिकाणी संशयितांचे तातडीने स्वॅब घेण्याबाबतची व्यवस्था करावी . अशा सूचना संबंधित आरोग्य पथकाला दिल्या असल्याचे संजय पाटील यड्रावकर यांनी शेवटी सांगितले.

error: Content is protected !!