शासन निर्देशांचे पालन करून स्वातंत्र्य दिन व गणेशोत्सव साजरा होणार; जयसिंगपूर नगरपरिषदेच्या बैठकीत निर्णय

जयसिंगपूर /ताः १०-प्रतिनिधी

         शासनाने घालून दिलेल्या निर्देशाप्रमाणे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व येणारा गणेशोत्सव साजरा करण्याचे जयसिंगपूर नगरपरिषदेने बोलावलेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले . सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर होते . १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व गणेशोत्सव साजरा करणे . याबाबत नियोजन करण्यासाठी जयसिंगपूर नगरपरिषदेने आज बैठकीचे आयोजन केले होते . देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहांमध्ये झालेल्या बैठकीमध्ये मुख्याधिकारी टीना गवळी यांनी बैठकीचा हेतू उपस्थित सदस्यांना सांगितला . बैठकीस राजर्षी शाहू व ताराराणी आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते,
प्रथेप्रमाणे जयसिंगपूर नगरपरिषद, गांधी चौक येथे झेंडावंदन व मुख्य ध्वजारोहण सोहळा दसरा चौकातील राजर्षी शाहू स्टेडियमवर संपन्न करण्याचे बैठकीत ठरले . स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोरोना महामारीच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या सर्व कोरोना योद्ध्यांचा नगरपरिषदेच्या वतीने सत्कार करण्याचे ठरले .
          जयसिंगपूर शहरामधील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांकडून प्लाझमा दान करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे व प्लाझमा दान शिबीर आयोजित करावे , असेही बैठकीत ठरविण्यात आले . स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरांमध्ये जिलेबी आणि मिठाईचे स्टॉल उभारणार्‍या व्यवसायिकांना शासन निर्देशांचे पालन करून विक्री स्टॉल उभे करण्यास मान्यता देण्याचे निश्‍चित करण्यात आले .


            गणेशोत्सव हा सर्व धर्मियांच्या भावनेचा सण शहरांमध्ये साजरा करताना श्री. गणेश मूर्तीच्या विक्रीसाठीचे स्टॉल, फळे, फुले यासारखे विक्री स्टॉल या ठिकाणांवर गर्दी होऊ नये . व सोशल डिस्टंसिंग पाळले जावे . यासाठी या वर्षी सर्व स्टॉल ग्रामदैवत श्री. सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात उभारण्यास परवानगी देण्याचे बैठकीत ठरले . गणपतीची मूर्ती विक्री करण्यासाठी जयसिंगपूर शहरांमधील स्थानिक विक्रेत्यांना प्राधान्याने जागा उपलब्ध करून द्यावी . अशी सूचना नगरसेवकांनी मांडली यास सर्वांनी संमती दिली. घरगुती गणेश मूर्तींची विक्री पारंपरिक मूर्तिकारांनी त्यांच्या स्वतःच्या घरांमधून करावी . असे निर्देश देण्याचे ठरले . स्वातंत्र्य दिन व गणेशोत्सव या दोन्ही सणाच्या नियोजनानंतर सभा अध्यक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी आयसोलेशन कोविड सेंटर शहरात सुरू करण्याबाबत उपस्थित सदस्यांना माहिती दिली . यावर सर्वच सदस्यांनी आयसोलेशन सेंटर तातडीने सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही व्हावी . अशी अपेक्षा व्यक्त केली . या निर्णयास पाठिंबा व्यक्त केला, यावेळी स्वातंत्र्य दिन समारंभा निम्मित कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यासंबंधी व आयसोलेशन सेंटर सुरू करण्यासंदर्भातील नियोजन करावे . यासाठी नगरपरिषदेमधील दोन्ही आघाड्यांमधील प्रमुख नगरसेवकांच्या कमिट्या गठित करण्यात आल्या .
            बैठकीमधील चर्चेत नगरसेवक बजरंग खामकर, संभाजी मोरे, प्रेमला मुरगुंडे, आसावरी आडके, राहुल बंडगर, शैलेश चौगुले, शितल गतारे, अनुराधा आडके, रेखा देशमुख, दीपा झेले, पराग पाटील यांनी सहभाग घेतला. स्वरूपा राजेंद्र पाटील-यड्रावकर, संजय पाटील कोथळीकर, आसलम फरास, शिवाजी कुंभार, संगीता पाटील- चिंचवाडकर, सुलक्षणा कांबळे, गणेश गायकवाड, रूपाली कलकुटगी, महेश कलकुटगी, युनूस डांगे, मुक्ताबाई वगरे, नगरसेवक नगरसेविका पालिकेचे अधिकारी व कर्मचारी बैठकीस उपस्थित होते

error: Content is protected !!