अवैद्य गुटखा ,सुगंधी तंबाखूवर कारवाई : २१ लाख ५० हजाराचा मुद्देमालासह संशयित ताब्यात ; जयसिंगपुर पोलीसांची मोठी कारवाई

जयसिंगपूर / ता.२-प्रतिनिधी

बेकायदेशीपणे गुटखा पान मसाला, सुंगधी तंबाकुची वाहतुक करणाऱ्या वाहनांवर जयसिंगपूर पोलिसांनी धडक कारवाई केली. सदरची कारवाई कोल्हापूर -सांगली महामार्गावरील उदगाव टोलनाक्यावर मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाली असून कारवाईत सुमारे 21 लाख 51 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या कारवाईमुळे परिसरातील अवैघ गुटखा विक्री व्यवसाय करण्याऱ्यां माफीयांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत जयसिंगपूर पोलिसांतुन मिळालेली अधिक माहिती अशी, मंगळवारी सायकांळी कोल्हापूर-सांगली बायपास महामार्गावरुन आयशर टेम्पो (एम.एच. 10 सी.आर. 1911) मधुन गुटखा पान मसाला, सुंगधी तंबाकु असा मुद्देमाल अवैधरित्या वाहतुक होत असल्याची माहिती खबऱ्यांकडून जयसिंगपूर पोलिसांना मिळाली होती. यावरुन पोलिसांनी उदगांव टोलनाक्यावर साफळा रचून अवैद्य गुटखा, सुगंधी तंबाखू, पान मसाला हा मुद्देमाल व संयशित आरोपीना ताब्यात घेतले. विशाल सुनिल हेगडे (वय 26 रा.पिंपळे मैदानाजवळ हरीपूर ता.मिरज, जि. सांगली), नामदेव आबा ऐवळे (वय 26 रा.नवीन वहसात, टिंबर एरिया सांगली), महेश शामलाल नानवाणी (वय 52 रा. मार्केट यार्ड सांगली) गुप्ताजी (पुर्ण नाव माहित नाही रा. निपाणी जि.बेळगांव) अशी त्यांची नावे असून या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तर चौथा गुप्ताजी अद्याप पोलिसांच्या ताब्यात नाही.
कारवाईत 9 लाख 75 हजार रुपयांचा हिरा पान मसाला लहान पाऊच असलेली 78 मोठी पोती व रॉयल 717 टोबँकोचे लहान पाऊचची 39 मोठी पोती, 1 लाख 30 हजार रुपयाचे हिरा पान मसाल्याचे मोठी पाऊच असलेली 10 मोठी पोती व रॉयल 717 टोबँकोचे मोठे पाऊची 4 मोठी पोती, 41 हजाराचा हिरा पान मसाला लहान पाऊच असलेली 3 मोठी पोती व रॉयल 717 टोबँकोचे लहान पाऊच 1 पोते, 5 हजार रुपयाची चिरमुरे भरलेली 50 प्लाटिकची पोती यासह अवैध गुटखा व पान मसाला, सुंगधी तंबाकुसह 10 लाख रुपयाचा आयसेर टेम्पो असा एकुण 21 लाख 51 हजार 100 मुद्देमाल ताब्यात घेतला.
याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल अमोल अवघडे यांनी दिली असून या कारवाईत पोलिस कॉन्स्टेबल रोहित ढवळे , वैभव सुर्यवंशी अभिजित भातमारे , विजय पाटील यांचा समावेश होता पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे करीत आहेत.
दरम्यान बुधवारी दुपारी सर्व संशयितांना येथील प्रथमवर्ग न्यायालयासमोर उभे केले असता सर्वांना ५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मावा विक्रीवर कारवाई कधी
जयसिंगपूर शहर आणि परिसरामध्ये मावा विक्रीचे लोन मोठ्या प्रमाणात पसरले आहे.चौकाचौकामध्ये रात्री उशिरापर्यंत राजरोसपणे मावा विक्री केली जाते. गुटखा पानमसाला व सुगंधी तंबाखूवर झालेली मोठी कारवाई लक्षात घेता यापेक्षाही मोठी कारवाई मावा विक्रीची होऊ शकते . मग याकडे पोलीस डोळेझाक का करीत आहेत ? असा सवालही नागरिकांच्यातून विचारला जात आहे.

error: Content is protected !!