जेईई मेन परीक्षा येत्या गुरुवारपासून

पुणे : राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात येणारी दुसऱ्या सत्रातील जेईई मेन परीक्षा येत्या गुरुवारपासून सुरू होणार आहे. देश आणि विदेशातील ३१९ शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. देशातील विविध शिक्षण संस्थांमधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जेईई मेन ही परीक्षा ‘एनटीए’मार्फत घेण्यात येते. जानेवारी आणि एप्रिल अशा दोन सत्रांत ही परीक्षा घेतली जाते. बी.ई. आणि बी.टेक.साठी ४, ५, ६, ८, ९ एप्रिलला ही परीक्षा होणार आहे. तर बी.आर्च, बी. प्लॅनिंग या अभ्यासक्रमासाठी १२ एप्रिल रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे.

error: Content is protected !!