ऐतवडे खुर्द जिजामाता विद्यालय शंभर टक्के पास

इस्लामपूर /ता : १

               ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील नवजीवन शिक्षण संस्थेच्या जिजामाता माध्यमिक विद्यालाचा इ. १० वीचा निकाल शंभर टक्के लागला. यामध्ये केदार सुरेश शेखर ९४ टक्के, सौरभ अधिकराव पाटील ९२.२० टक्के, सम्राज्ञी संजय जाधव ९१.४० टक्के, राहुल संभाजी पाटील, तेजस बाबासो शेखर ९०.२० टक्के, हर्षद गोरक्षनाथ सावंत ९० टक्के असे गुणप्राप्त केले.
विद्यार्थ्यांना संस्थापक अध्यक्ष उत्तम पाटील, मुख्याध्यापिका सुरेखा यादव, प्राचार्या सविता पाटील यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!