रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबतर्फे पत्रकारांचा सत्कार

इचलकरंजी/प्रतिनिधी –
रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब इचलकरंजी यांच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधत शहरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. प्रोबस क्लबचे संचालक प्रमुख पाहुणे धनपाल बिंदगे आणि रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांच्या हस्ते अजय काकडे आणि हुसेन कलावंत यांचा सत्कार करण्यात आला.
6 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरु केले. त्यानिमित्त 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधत रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्या वतीने प्रमुख पाहुणे धनपाल बिंदगे आणि रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रोबस क्लब डिस्ट्रीक्ट चेअरमन प्रकाशराव सातपुते, प्रोजक्ट कमिटी चेअरमन सौ. प्राजक्ता होगाडे यांचे प्रमुख उपस्थितीत पत्रकार दिना निमित्त प्रातिनिधीक पत्रकार म्हणुन दैनिक महासत्ताचे अजय काकडे आणि दैनिक लोकनेताचे हुसेन कलावंत यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे धनपाल बिंदगे यांचा सत्कार जयप्रकाश शाळगांवकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांचा परिचय गोविंद टिळंगे यांनी करुन दिला. याप्रसंगी स्वागत रोटरी प्रोबस क्लबचे अध्यक्ष शिवबसु खोत यांनी केले. रोटरी प्रोबस क्लबचे सचिव विजय पोवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रकाशराव सातपुते यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार अजय काकडे आणि हुसेन कलावंत यांचा परिचय विजय हावळे यांनी करून दिला.

पत्रकार अजय काकडे, हुसेन कलावंत आणि प्रमुख पाहुणे धनपाल बिंदगे यांनी संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी जानेवारी 2024 मधील संस्थेचे सदस्य वैशाली पाटील, प्रमोदिनी देशमाने, शंकर लाखे यांना वाढदिवसानिमित्त क्लबच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. सभासदांच्या वतीने अ‍ॅड. विश्‍वास चुडमूंगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शारदा कवठे यांनी केले. आभार विजय हावळे यांनी मानले.
याप्रसंगी प्रोबसचे सदस्य सुनंदा कांबळे, मंजुळा कांबळे, स्वाती पाडळे, जुगल तिवारी, गजानन सुलतानपुरे, महावीर कुरुंदवाडे, आप्पासाहेब कुडचे, रामचंद्र निमणकर, सौ. निर्मला मोरे, दिलीप शेट्टी, किरण कटके, बाळासो रूईकर, अरूण केटकाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!