केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली : दिल्लीतील गाजलेल्या मद्यधोरण घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडीनंतर त्यांची रवानगी तिहार कारागृहातील बरॅक नंबर २ मध्ये ठेवण्यात आले आहे. दिल्ली- तील सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीश कावेरी बवेजा यांनी हा आदेश दिला. सोमवारी केजरीवाल यांना त्यांच्यासमोर उपस्थित केले केजरीवाल यांना प्रारंभी ईडीची कोठडी देण्यात आली होती. त्याचा कालावधी १ एप्रिलपर्यंत होता.

error: Content is protected !!