कोल्हापूर प्रतिनिधी/ ता 30
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण कोल्हापूर संस्था संचलित श्री ज्योतिर्लिंग विद्या मंदिर वडणगे निगवे दुमाला प्रशालेचा एसएससी परीक्षा 2019-20 चा निकाल 99.61 टक्के लागला आहे.




यामध्ये शाळेच्या कु. प्राची पांडूरंग पाटील (97%) गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. कु.प्रणव प्रशांत तेलवेकर (95.60%) व कु.सलोनी संदीप साखळकर (95.60%) यांनी विभागून द्वितीय क्रमांक व कु. सुप्रभा राजेश देवने (95.40%) हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे. 259 पैकी 258 विद्यार्थी पास झाले असून 106 विद्यार्थी विशेष श्रेणीमध्ये पास झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे कार्याध्यक्ष मा.अभयकुमारजी साळुंखे, सचिव मा. प्राचार्या शुभांगी गावडे, सर्व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक एम. एम. ताशीलदार उपमुख्याध्यापिका सौ एस. टी. बने, शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व पालकांचे मार्गदर्शन मिळाले
