‘इम्यूनिटी बुस्टर’ वाटप सामाजिक स्तुत्य उपक्रम -डॉ. विजय इंगवले ; स्वामी ग्रुप व कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनचा सहभाग

कबनूर / प्रतिनिधी

  रोगप्रतिकारक शक्तीवर्धक ‘इम्यूनिटी बुस्टर’ मुळे लोकांना मोठा दिलासा मिळत आहे. मोफत ‘इम्यूनिटी बुस्टर’ वाटप हा सामाजिक स्तुत्य उपक्रम आहे. असे प्रतिपादन डॉ.विजय इंगवले यांनी केले.

रोगप्रतिकारक शक्तीवर्धक इम्युनिटी बुस्टरचे वाटप करताना डॉ.विजय इंगवले शेजारी विवेक स्वामी,प्रा.रवींद्र पाटील,महावीर पिंपळे,वर्षा कोरे, सचिन सुतार आदी मान्यवर

 कबनुर येथील साखर कारखाना रस्त्यावरील स्वामी ग्रुपच्या कार्यालयासमोर श्री. क्षेत्र सिद्धगिरी मठाचे मठाधिपती पुज्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या सहकार्याने तसेच कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन व स्वामी ग्रुपच्या सौजन्याने ‘मोफत इम्यूनिटी बुस्टर’वाटप शुभारंभ प्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
  स्वामी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विवेक स्वामी यांनी स्वागत केले.कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट्स वेलफेअर असोसिएशनचे जिल्हासंघटक प्रा.रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले.दैनिक सकाळचे पत्रकार अतुल मंडपे,शशिकांत राज,तानाजी पाटील, कबनूर पत्रकार संघाचे अध्यक्ष टिप्पू सनदी,अजित लटके आदिनी मनोगत व्यक्त केले.
  यावेळी बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक दत्ता पाटील, अजित खुडे, स्वामी विवेकानंद फाऊंडेशनचे दत्ता शिंदे, शांतीनाथ कामत, धनाजी देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन सुतार, रियाज बागवान संजय जाधव,सुधीर मुचंडी,वर्षा कोरे,महावीर पिंपळे ,अश्विनी स्वामी, दीपक पाटील, अलंकार हिरेमठ, रमेश पटेल, अनिरुद्ध कोरे, सुरेखा स्वामी, दीक्षा देवकर, समृद्धी स्वामी, राजू हजारे आदीसह कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन व स्वामी ग्रुपचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!