एक लारव वीस हजार रूपयाची लाच घेताना लिपीकास पकडले रंगेहाथ

                            सागर आनंदराव शिगावकर

कोल्हापूर /ताः ६

               हमिदवाडा (ता .कागल ) येथील जमिनीचे तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याप्रमाणे मूल्यांकनानुसार नियमीत करून देण्यासाठी एक लाख वीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना सागर आनंदराव शिगावकर (रा . उमा टॉकीज जवळ , रविवार पेठ , कोल्हापूर ) याला रंगेहात पकडले . ही घटना मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील राधानगरी कागल उपविभागीय कार्यालयात घडली . या घटनेमुळे महसूल विभागातील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे . ही कारवाई उपायुक्त राजेश बनसोडे व अप्पर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत पो . नि . जितेंद्र पाटील पो . कॉ . मयुर देसाई , रुपेश माने , व संदिप पडवळ आदींनी केली .

error: Content is protected !!