
कोल्हापूर / ताः ६
परजिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना आपापल्या जिल्ह्यात येता यावे . यासाठी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्याचे निर्देश संबधित अधिकाऱ्यांना देण्यात येतील . असे आश्वासन ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी शिक्षक संघाच्या कोल्हापूर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा लक्ष्मी पाटील यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळास दिले .
गेल्या दोन वर्षात विस्थापित होऊन गैरसोयीत असलेल्या महिला शिक्षिकांची सोयीच्या शाळेत बदली होणेबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल . असेही आश्वासन ना.मुश्रीफ यांनी शिष्टमंडळास दिले. गुरूपौर्णिमेच्या दिवशी महिला आघाडी अध्यक्षा लक्ष्मी पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकारी शिक्षिकांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात, बदलीसाठी असलेली रिक्त पदांची १० % ची अट रद्द करून ज्या जिल्ह्यात एखाद्या प्रवर्गाच्या जागा उपलब्ध नसतील तर त्यांना शुन्य बिंदूवर तात्पुरते विनाअट सामवून घ्यावे . भविष्यात सेवानिवृत्ती व पदोन्नतीमुळे जसजसे बिंदू उपलब्ध होतील . तसतसे त्यांना मुळ बिंदूवर सामावून घ्यावे. गेल्या दोन वर्षात झालेल्या ऑन लाईन बदली प्रक्रियेत विस्थापीत झालेल्या गैरसोयीत असलेल्या शिक्षकांना स्वतालुक्यात पदस्थापना देण्यात यावी. यामध्ये प्राधान्यांने महिलांची सोय करावी. बदलीमुळे रिक्त होणाऱ्या जागा भरतीद्वारे भरण्यात याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
आज भेटलेल्या शिष्टमंडळात महिला आघाडी माधुरी यादव , रोहिणी लोकरे , नूतन सकट , वैशाली कोंडेकर , निता पोतदार , सविता येरूडकर , मनीषा चौगुले, मीना चव्हाण , जयश्री माने , छाया मोरे , प्रेमा डवरी , पल्लवी परीट ,मीनाक्षी पोटले ,योगिता कुंभार, शारदा पाटील, संपदा चावरेकर,मैथिली नायकवडे आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.