फाय ग्रुपचे अध्यक्ष पंडीतकाका कुलकर्णी यांचे निधन

इचलकरंजी /ताः ७

        फाय ग्रुपचे अध्यक्ष व दानशुर व्यक्तीमत्व पंडीतकाका कुलकर्णी यांचे सोमवारी रात्री निधन झाले.न्युमोनियाच्या त्रासामुळे काल त्यांना कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना सोमवारी रात्री दहा वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे. पंडितकाका कुलकर्णी यांच्या निधनाने उद्योगक्षेत्रात शोककळा पसरली आहे.
       फाय प्रायव्हेट लिमिटेड या त्यांच्या उद्योगसमूहात सुमारे पंचवीस कंपन्या आहेत. जपानच्या केहींन या कंपनीबरोबर त्यांनी केहीन, फाय असा संयुक्त उद्योग प्रकल्प पुणे येथे सुरू केला होता.फाय ग्रुपचे अध्यक्ष पंडीतकाका कुलकर्णी यांनी विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल भारतीय व्यक्तींचा गौरव करण्याच्या हेतूने फाय फाउंडेशनची स्थापना केली. यातील सर्वोच्च पुरस्कार राष्ट्रभूषण पुरस्कार या नावाने दिला जातो. हा पुरस्कार दरवर्षी इचलकरंजी येथे एका भव्य समारंभात एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या हस्ते दिले जातात. या पुरस्कार वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर, प्रमोद महाजन ,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, अभिनेते दिलीप कुमार, उद्योगपती राहुल बजाज उपस्थित राहिले होते.
फाय फाउंडेशनच्या वतीने प्रतिष्ठेचा फाय पुरस्कार दिला जात असे. या पुरस्काराच्या निमित्ताने देशातील विविध क्षेत्रातील मान्यवर इचलकरंजीसारख्या छोटेखानी शहरांमध्ये वीस वर्षापूर्वी येत असत . फाय फाउंडेशन च्या वतीने विविध क्षेत्रातील आपदग्रस्तांना मोठी मदत केली जात असते.

error: Content is protected !!