आळते येथे आज कलश यात्रेचे आयोजन

अयोध्या येथील राम मंदीरात (Ram temple in Ayodhya) २२ जानेवारीला होणाऱ्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा समारंभाच्या निमित्ताने आळते येथे अक्षता कलश व पत्रिका येणार आहेत. या कलशाचे पूजन व शोभायात्रेचे आयोजन आज सायंकाळी ५ वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीने केले आहे. सजीव देखावा, हालागी , ढोल- ताश पथक, भजनी मंडळ या सर्वांचा या शोभायात्रेमध्ये सहभाग आहे. जिवंत हनुमान देखावा व हत्ती हे या शोभायात्रेचे विशेष आकर्षण असणार आहे.

त्यानंतर घरोघरी अक्षता वितरीत करण्यात येणार आहेत. तरी सर्व रामभक्तांनी पारंपारीक वेशभूषेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!