कबनुर येथील पुरुष व दोन महिला क्वांरनटाईन तर सहा विलगीकरण कक्षात ,परिसरात घबराट

कबनूर /ता :४

           शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील एका वृध्द कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचा मृत्यू झाला. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी काढण्यात आली होती.त्या यादीत कबनुर माळभागातील झोपडपट्टी मधील एका व्यक्तीचा समावेश आहे. हे समजताच ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सदर व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याला तातडीने स्वॅब तपासणीसाठी अतिग्रे येथिल संजय घोडावत इन्स्टिट्युट येथे रवाना करण्यात आले.तर त्याच्या कुटुंबातील सहा जणांना कबनुर हायस्कूल येथे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे.तसेच हा रुग्ण वास्तव्यास असलेला भाग सील करण्यात आला आहे.दरम्यान इचलकरंजी येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात आलेल्या कबनूरमधील गांधी विकास नगरमधील दोन महिलांनाही स्वॅब तपासणीसाठी संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे रवाना करण्यात आले.सदर घटनेने या परिसरात घबराट पसरली आहे.
            दरम्यान गावच्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना समितीचे अध्यक्ष तथा सरपंच सुनिल स्वामी यांनी समितीची तातडीने बैठक बोलावली. बैठकीत कबनुर, इचलकरंजीसह पांच गांवामध्ये केलेल्या लॉकडाऊनबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची माहिती दिली.तसेच गावामध्ये रिक्षा फिरवून ग्रामस्थांना या आदेशाचे काटेकोरपणे पालन करणेबाबत सूचना दिल्या. त्या बरोबरच गांवामध्ये औषध, सॕनिटायझर, धुर फवारणीस सुरवात केली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा, ओषधे, दूध वगळता इतर सर्व व्यवहार १३ जूलै पर्यंत बंद ठेऊन कडकडीत बंद पाळावा,मास्क वापरावा, हात साबणाने धुवावेत, सोशल डिस्टनिंग पाळावे,अति आवश्यकता असलेशिवाय घराबाहेर पडु नये, दक्षता घ्यावी असे आवाहन केले.
            बैठकीस माजी पंचायत समिती सदस्य जयकुमार काडाप्पा, कबनुर भाजपाध्यक्ष सुधीर पाटील, ग्रामपंचायत सदस्य बलराम भोजणे, कुमार कांबळे, जवाहर बँक संचालक बबन केटकाळे, शंकर सुतार, जावेद फकीर, विनायक इंगवले आदि उपस्थित होते.

error: Content is protected !!