कापूसखेड ग्रामपंचायतीस दलित महासंघाचे निवेदन

इस्लामपूर /ताः ३

        सत्यशोधक ,साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे जन्म शताब्दी वर्ष आहे.त्यानिमित्ताने दलित महासंघाच्या वतीने अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे . या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रभर अभियान सुरु केले आहे . तरी सत्यशोधक डॉ. अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे . 

         यासाठी ग्रामपंचायतीने ठराव करून महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्यात यावा . यासाठी कापुसखेडच्या ( ता. वाळवा ) सरपंच  मंदाताई धुमाळे यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी दलित महासंघाचे वाळवा तालुका संघटक रविंद्र बल्लाळ, माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, राजेश पाटील, अशोक धुमाळे, सुरेश शिताप , तेजस धुमाळे,अभिजीत धुमाळे, शुभम बल्लाळ, सुरज धुमाळे, अभि तडाखे, तौफिक मुजावर,विनोद धुमाळे, दिलीप बल्लाळ, पांडुरंग बल्लाळ उपस्थित होते.

 

कापुसखेडच्या सरपंच मंदाताई धुमाळे यांना निवेदन देताना दलित महासंघाचे पदाधिकारी व अन्य मान्यवर

error: Content is protected !!