हातकणंगले /ता .२०-प्रतिनिधी
प्रथमचार्य प.पू .108 शांतीसागर महाराज यांची 65 वी पुण्यतिथी निमित्य कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को -ऑप क्रेडीट सोसायटीच्या आळते शाखेत अभिवादन करणेत आले. यावेळी फोटोपूजन व नमोकार मंत्राचे पठण करणेत आले .
यावेळी संस्थेचे चेअरमन भाऊसो पाटील म्हणाले , जैन धर्मांचा प्रसार व श्रेष्ठ विचार प्रथमचार्य प.पू .108 शांतीसागर महाराज यांनी रुजविण्याचे काम अखेरपर्यंत केले आहे . त्यांच्या आदर्श विचारांना अभिवादन करणे . प्रत्येक जैन बांधवाचे आद्य कर्तव्य आहे .यावेळी आदिनाथ मजलेकर, सचिन टारे, अभय टारे, अमोल चौगुले, दिलीप टारे, राजेंद्र चौगुले, हुवाण्णा मजलेकर, राजू चव्हाण, सुरेश बाळाजी, महावीर टारे, संतोष पाटील, अनुष्का टारे आदि मान्यवर उपस्थित होते.
