कारसेवकांना सलाम

          अयोध्या आणि राममंदिर हा मुद्दा चर्चेत आला की , त्यासोबत कारसेवक हा एक शब्द प्रखरशाने कानावर पडतो . राममंदिर निर्माण आंदोलन सुरू झाल्यापासुन ‘कारसेवक ‘ हा शब्द नेहमीच चर्चेत राहीला आहे . ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशिद पाडल्यानंतर कारसेवक शब्द जास्तच चर्चेचा विषय बनला आहे . लाखो कारसेवकांनी राममंदीर निर्माण आंदोलनात भाग घेतल्याचे म्हटले जाते . काही कारसेवकांना तर या आंदोलनात प्राण गमवावे लागले . त्यामुळे आजचा हा सुवर्ण दिवस बघायचे भाग्य कोटयावधी भारतीयांच्या नशीबात फक्त कारसेवकांच्या त्यागामुळे शक्य आहे .

         मुळात कारसेवक हा संस्कृत शब्द आहे . कार म्हणजे कर (हात) व सेवक म्हणजे सेवा देणारा . स्वयंस्फुर्तीने सेवा देणाऱ्याला कारसेवक म्हटले जाते . जी सेवा संपूर्णपणे निस्वार्थ भावनेने दिली जाते . जी व्यक्ती धर्माच्या कार्यासाठी निस्वार्थपण कार्य करते . अशा व्यक्तीला कारसेवक म्हणता येईल . कारसेवकालाच इंग्रजीमध्ये व्हॉलेंटियर म्हटले जाते .
राममंदीर निर्माण आंदोलनामध्ये हुतात्मा झालेले कारसेवक , अनेक राजकीय नेते , हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते , साधु-संत , ज्ञात -अज्ञात , इच्छा असुन वयामुळे सहभागी होता न आलेले , काही फक्त हिंदुत्ववादी विचाराचे अशा अनेक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लोकांनी कारसेवकाची भुमिका पार पाडली . आणि आंदोलन यशस्वी केले . या सुवर्णदिनी या लाखो कारसेवकाच्या कार्याला सलाम करूया … !

शब्दांकन
मनिष कुलकर्णी.

error: Content is protected !!