कार्तिकी एकादशी

संग्रहित छायाचित्र

कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते. ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो.

कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतुन जागी होतात व पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्विकारतात असे मानतात, त्यामुळे हिला देवोत्थनी, देव उठी एकादशी असेही म्हणतात..

तुलसी विवाहाची सुरुवात होते ती याच दिवसापासून. कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते आणि लग्नसराईचे दिवस सुरू होतात..

पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा, त्याच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस..

कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौणिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्री कृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुळशी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्ष प्राप्ती होते. भारतीय संस्कृतीत तुळशीला फार महत्व आहे. श्रीविष्णूला तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असेही संबोधले जाते. तुळशीशिवाय केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराणात म्हटले आहे. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले, तेंव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले. त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे मानले जाते. तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते केली जातात त्याचे उद्यापन करतात. विठ्ठला विष्णूचे रूप मानले जाते. त्यामुळेच कार्तिकी एकादशीला पंढरपुरात विठुरायाच्या मंदिरात तुळशीचा विवाह पार पडतो. 

टिप :- सदर माहिती आमच्या वाचनात आली असून आम्ही यांच्याशी 100% सहमत आहोतच असे नाही.

error: Content is protected !!