विश्वविक्रमवीर डाॅ. केदार साळूंखे यास आदर्श बालगौरव क्रिडारत्न पुरस्कार.

पेठ वडगांव / ता.१८ मिलींद बारवडे

         विश्वविक्रमवीर स्केटर व सायकलिस्ट डाॅ. केदार विजय साळूंखे वय वर्षे अवघे आठ यास मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांचे वतीने देण्यात येणारा ,’आदर्श बालगौरव क्रिडारत्न पुरस्कार’ २०२० व किडस ॲचिव्हर आयकॉन अवॉर्ड २०२० पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ. प. केशवजी महाराज सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
         विश्वविक्रमवीर डाॅ.केदार साळुंखे यांने अवघ्या सातव्या वर्षी सायकलिंगमध्ये एकाच बुकमध्ये एका वेळी चार रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय ठरला आहे. आतापर्यंत स्केटींग व सायकलिंगमध्ये १२ विश्वविक्रम नोंदवले आहेत.तसेच अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अनेक स्पर्धेत विजेतेपद पटकावली आहेत. यामधे गाेल्ड २०, सिल्वर १६ , ब्राँझ १५पदक व अन्य बक्षिसेही मिळविली आहेत.
          सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. श्री केशवजी महाराज सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रसंस्थापक अध्यक्ष अॅड.कृष्णाजी जगदाळे ज्येष्ठ समाजसेवक अशोकानंदजी जवळगावकर, ज्येष्ठ पत्रकार सदानंद खोपकर, आयकर अधिकारी श्रीमती अरुणा परब यांनी या समारंभाला विशेष पाहुणे म्हणून ऑनलाईन उपस्थिती नोंदविली हाेती.डाॅ.केदार साळुंखे याला विबग्याेर स्कुलच्या प्राचार्या स्नेहल नार्वेकर,काेच सचिन इगंवले, स्वप्निल काेळी, वडिल विजय साळूंखे व आई स्वाती गायकवाड साळूंखे यांचे मार्गदर्शन लाभले आहे .

डॉ.केदार साळुंखे ऑनलाईन पुरस्कार स्विकारतांना शेजारी वडील पी.आय. विजय साळुंखे आई डीवायएसपी स्वाती गायकवाड साळुंखे राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ.प. श्री केशवजी महाराज प्रसंस्थापक अध्यक्ष अॅड. कृष्णाजी जगदाळे प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थित.

error: Content is protected !!