वारणानगर/ता.३० :हेमंत सोने
केखले (ता . पन्हाळा ) गाव कोरोना मुक्त रहावे . यासाठी यंदाचा सार्वजनीक गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय बावीस गणेश मंडळानी घेतलेला आहे. यासंदर्भात बैठक आयोजीत करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच उषा कांबळे होत्या.या सभेला सर्व गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, कोरोना दक्षता समिती व ग्रामस्थ उपस्थित होते.
सध्या जिल्ह्याभरात कोरोणाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. तर परिसरातील गावातुनही कोरोनाचा फैलाव सुरू झाला आहे. केखले गाव मात्र आत्तापर्यंत सुरक्षित आहे. या पार्श्वभुमीवर बैठक झाली.राज्यातील अनेक ग्रामपंचायतींनी ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवली आहे. मात्र परिसरातील गावामध्ये मोठ्या प्रमाणात रोगाचा फैलाव सुरू असल्याने ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी सर्व सार्वजनिक मंडळानी गणेशोत्सव रद्द करण्याचा एकमुखी निर्णय घेतला. यावेळी २२ मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह, सरपंच उषा माणिक कांबळे,उपसरपंच आर.एस.पाटील , पोलिस पाटील कुंडलिक निकम, हनुमान दूध संस्थेचे चेअरमन तानाजी मगदूम, जोतिर्लींग दूध संस्थेचे चेअरमन के.आर. पाटील,हनुमान पतसंस्थेचे चेअरमन भिमराव पाटील, विश्वास कार्वेकर, आप्पा गुरव, ग्रा.पं.सदस्य दिलीप पाटील,पी.एस.पाटील, सुरेश निकम यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, कोरोना दक्षता समिती पदाधिकारी,सदस्यांची उपस्थिती होती.