खोची व श्रीकृष्ण विकास सेवा संस्थेची वसुली शंभर टक्के

खोची /ताः ४

      दीपकराव पाटील

सभासद व कर्जदार यांनी प्रामाणिकपणे केलेले मोलाचे योगदान व वेळेवर भरलेली कर्जाची रक्कम यामुळेच खोची विकास सेवा संस्थेची शंभर टक्के कर्ज वसुली झाली आहे. हा अन्य सहकारी संस्थासमोर एक आदर्श आहे. असे गौरवोद्धगार खोची विकास सेवा संस्थेचे सभापती दीपकराव पाटील यांनी व्यक्त केले. संस्थेच्या शंभर टक्के कर्जवसुली बैठकीच्या बैठकीत बोालत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य वसंतराव गुरव, महावीर मडके, कुमार पाटील,भैरवनाथ दूध संस्थेचे व्हाईस चेअरमन महेश पाटील, संचालक सयाजीराव पाटील, बाबुराव पाटील, बाळासाहेब पाटील, अरविंद बाबर, संभाजी पाटील, अमृत शिंदे आदी उपस्थित होते.
संस्थेने अहवाल सालात ऊस पीक सबल, दुर्बल कर्ज, खावटी कर्ज, किसान सहाय्य मध्यम मुदत, मोटरसायकल मध्यम मदत कर्ज अशी एकूण तीन कोटी, चौऱ्याहत्तर लाख रुपयाची कर्ज वसुली केली आहे. तीस जून पूर्वी शंभर टक्के कर्ज वसुली करून संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. कोरोणा सारख्या आपत्तीच्या काळातही शेतकऱ्यांनी कर्ज वसुलीस सहकार्य केले आहे. आगामी काळात सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध शेती साहाय्य योजना राबविण्यासाठी कटिबद्ध राहणार आहोत. तसेच या कर्जवसुलीसाठी हातकणंगले उपनिबंधक कार्यालयाचे डॉ. बागल,आर.जी. कुलकर्णी, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय अधिकारी पांडुरंग शेंडगे, बँक निरीक्षक इंद्रजित पाटील यांचेसह विविध साखर कारखाना प्रशासनाचे सहकार्य लाभले. अशी माहिती दीपक पाटील यांनी सांगितले. यावेळी संचालक गोविंद गुरव, महादेव बंडगर, जयश्री पाटील, शारदा पाटील, प्रदीप जाधव, राहुल पाटील, कार्यलक्षी संचालक नामदेव जाधव . यांच्यासह प्रकाश चव्हाण, सागर थोरवत,रामचंद्र जाधव, लक्ष्मण पाटील, तानाजी थोरवत आदि मान्यवर उपस्थित होते.

               प्रा.बी.के.चव्हाण

श्रीकृष्ण शेतकरी सहकारी विकास सेवा संस्थेची पीक कर्ज वसुली १०० टक्के करण्यात आली. राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा.बी.के.चव्हाण यांच्या मार्गदर्शनखाली संस्थेचे कामकाज सुरू आहे . सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात संस्थेने ऊस पीक, खावटी,मध्यम मुदत आदि प्रकारचे एक कोटी चोवीस लाख रूपये कर्जाचे वाटप केले होते.सभासद पातळीवरील कर्ज वसुली १०० टक्के करण्यात आली.या वसुली साठी संस्थापक प्रा.बी.के.चव्हाण,चेअरमन दादासो पाटील,व्हा.चेअरमन विजय मडके,संचालक मंडळ,सभासद,सचिव प्रदीप गुरव,जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी पांडूरंग शेंडगे,निरीक्षक भरत चौगुले,इंद्रजीत पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँक,खोची शाखाधिकारी संभाजी भंडारी,सर्व कर्मचारी,शरद -नंरदे,वारणा,जवाहर-हुपरी,राजाराम -बावडा साखर कारखाना,श्रीकृष्ण पत संस्था तसेच समूहातील सर्व पदाधिकारी,माजी उपसरपंच एम.के.चव्हाण ,विजय मगदूम,नंदकुमार घोडके आदिचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!