हुपरीच्या दत्त मंदिरात किरणोत्सव

हुपरी येथील वाळवेकर नगर या ठिकाणी सन २०११ मध्ये अनेक भक्ताच्या देणगीतून श्री दत्त मंदिर बांधण्यात आले आहे. परमपूज्य परमाब्धिकार परमात्माराज श्री क्षेत्र आडी यांच्या हस्ते श्री दत्त मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दरवर्षी वर्षातून दोन वेळा उगवत्या सूर्याची किरणे श्री दत्त मूर्तीचे चेहऱ्यापासून मूर्तीच्या चरणापर्यंत पडतात. फेब्रुवारी, मार्च, ऑक्टोंबर या महिन्यामध्ये किरणोत्सव होतो. यावर्षी ७ मार्च रोजी सकाळी ७ वाजून १८ मिनिटांनी किरणोत्सव झाला. हा किरणोत्सव अल्प वेळ होता. श्री दत्त मूर्ती ही जयपूर राजस्थान मधून व्हिएतनाम या दगडा पासून बनवलेली आहे. हे मंदिर लोकांचे एक श्रद्धास्थान झालेले असुन या ठिकाणी अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात.

error: Content is protected !!