कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याची आढावा बैठक

हातकणंगले / प्रतिनिधी
      हातकणंगले तालुक्यांमध्ये शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर पर्याय म्हणून घरोघरी जाऊन जनजागृती होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर हातकणंगले तालुक्यांमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये वेळेत उपचार मिळावा यासाठी डॉक्टरांसह नर्स व इतर कर्मचारी यांची संख्या वाढवण्यात यावी. यासह इतर आवश्यक बाबींवर चर्चा करण्यात आली. आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर होते .

     यावेळी जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव, महिला व बालकल्याण सभापती डॉ पद्माराणी पाटील व पंचायत समिती सभापती महेश पाटील , गटविकास अधिकारी अरूण जाधव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोरे त्याचबरोबर इतर विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते . आढावा बैठक हातकणंगले पंचायत समितीमध्ये पार पडली.

error: Content is protected !!