कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअरकडून आजीव पत्रकार सभासदांना वार्षिक विमा कवच – अध्यक्ष सुधाकर निर्मळे

कोल्हापूर / प्रतिनिधी
     कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या निधीतून कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील व निपाणी तालुक्यासह असे १३ तालुक्यातील एकूण २७६ आजीव सभासद पत्रकारांना दि ओरिएण्टल इंश्योरेन्स कंपनी लिमिटेडच्या नागरीसुरक्षा ग्रुप पॉलिसी शेड्यूलचे वार्षिक ग्रुप विमा कवच १ मे २०२१ पासून दिले जात असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी दिली आहे.

     यावेळी अध्यक्ष निर्मळे यांनी भविष्यकाळात आजीव सभासदांच्या हितासाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबविल्या जातील. तसेच कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशन ही संघटना सभासदांना कायमस्वरूपी संरक्षण देण्यासाठी कार्यरत असुन पत्रकारांच्यावरील प्रत्येक संकटाचे निरर्सन करणे , हेच एकमेव ध्येय असल्याचे सांगितले.
   हातकणंगले तालुका ७५ आजीव सभासद, पन्हाळा तालुका ३९आजीव सभासद, कागल तालुका ३८ आजीव सभासद, शिरोळ तालुका ३५ आजीव सभासद, भुदरगड तालुका २३ आजीव सभासद, चंदगड तालुका १५ आजीव सभासद, करवीर तालुका १४ आजीव सभासद, राधानगरी तालुका ११ आजीव सभासद,गडहिंग्लज तालुका ९ आजीव सभासद, शाहुवाडी तालुका ९ आजीव सभासद, आजरा तालुका २ आजीव सभासद, गगनबावडा तालुका १ आजीव सभासद,निपाणी तालुका ५ आजीव सभासद आदी २७६ आजीव पत्रकार सभासदांना वार्षिक विमा कवच दिले आहे.
    या विमा कवचामध्ये रस्त्यावरील गाडीवरून होणारा अपघात, सर्पदंश अपघात, पाण्यात बुडाल्याने अपघात,विजेचा शॉक लागल्याने अपघात, मारहाणीतून जखमी झाल्याने अपघात या पाच अपघातांचा समावेश आहे. या विमा कवचाच्या लाभाची सुरूवात ९ मे २०२१ पासून २७६ आजीव सभासद पत्रकारांना होईल.

error: Content is protected !!