शासनाच्या सुधारीत संच मान्यतेच्या धोरणास शैक्षणिक व्यासपीठाचा तीव्र विरोध – एस. डी. लाड.

पेठवडगांव /मिलींद बारवडे

 कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघासह शिक्षण संस्था चालक संघ शिक्षक व सेवक यांच्या संघटनांची संयुक्त बैठक मुख्याध्यापक संघामध्ये संच मान्यता व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या संदर्भात चर्चा करण्यासाठी आयोजित केली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी एस. डी.लाड होते.

कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत बोलतांना अध्यक्ष एस डी लाड शेजारी वसंतराव देशमुख , सुरेश संकपाळ , दत्ता पाटील , बाबासाहेब पाटील आदी मान्यवर.


 आयुक्त शिक्षण विभाग यांनी १३ जुलै २०२० रोजी सुधारीत संच मान्यता धोरण शासनाकडे प्रस्तावीत केले आहे. हे धोरण अतिशय चुकीचे असून शाळांच्यावर अन्याय करणारे आहे. संच मान्यते संदर्भात शालेय शिक्षण विभागाचा दि.२८ ऑगस्ट २०१५ चा निर्णय चुकीचा होता. त्या विरोधात महाराष्ट्रातून फार मोठया प्रमाणामध्ये आंदोलने झाली. तरीही ते धोरण २०१५-१६ पासून राबविले गेले. त्याविरोधात लोकप्रतिनिधींनी तसेच विधीमंडळाचे सन्मानिय सदस्यांकडून विधान मंडळांमध्ये लक्ष्यवेधी सूचना, प्रश्नोत्तरे यांच्या माध्यमांतून शासनाच्या या धोरणास विरोध केला.
या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्त यांनी प्राथमिक , उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक संवर्गातील पदासाठी सुधारीत निकष शासनाकडे प्रस्तावीत केले आहेत. ते महाराष्ट्रातील विशेषता ग्रामीण भागातील शाळांच्यावर अन्याय करणारे आहेत. विदयार्थी संख्येवर कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांना मान्यता दिली जाणार असल्यामुळे लहान शाळांना हे शिक्षक मिळणार नाहीत. इयत्ता पाचवीचा वर्ग माध्यमिक शाळातूंन कमी होणार आहे. नविन धोरणांनुसार अनेक शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. मुख्याध्यापक पद हे विदयार्थी संख्येंवर अंवलंबून असल्यामुळे अनेक शाळा मुख्याध्यापकाविना राहणार आहेत. कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार असून तेथील शिक्षकांचे अनेक शाळांमध्ये समायोजन केले जाणार आहे. भविष्यात अशा शाळेतील पटसंख्या वाढल्यास ती शाळा स्वयंम अर्थसहाय्य तत्वावर चालवावी लागणार आहे.
 संच मान्यतेचा हा सुधारीत प्रस्ताव म्हणजे ग्रामीण भागातील शाळा पूर्णपणे बंद करण्याचे धोरण असून यास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा तीव्र विरोध आहे. या विरोधात महाराष्ट्रभर शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविरोधी अनेक ठराव मंजूर करण्यात आले. कायम विनाअनुदानित शाळांच्या आंदोलनास पाठींबा देण्याचा ठरावही करण्यात आला. स्वागत चेअरमन सुरेश संकपाळ यांनी केले. याप्रसंगी सचिव दत्ता पाटील यांनी विविध ठराव मांडले.
 बैठकीस चेअरमन सुरेश संकपाळ ,सचिव दत्ता पाटील, शिक्षण संस्थाचालक संघ अध्यक्ष वसंतराव देशमुख, बाबासाहेब पाटील, सुधाकर निर्मळे, संतोष आयरे , पी. एन. पाटील, गजानन काटकर, राजाराम बरगे ,अशोक पाटील, मिलींद पांगिरेकर, जी. ए. पाटील, अशोक हुबळे ,एम .आर. पाटील, अजित रणदिवे, एस. के .पाटील, राजेश वरक, सुधाकर सावंत आदी संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!