कोयना धरणात 70.29 टिएमसी पाणीसाठा , चोवीस तासांत 3 टि.एम.सी. तर पाणी उंचीत 4 फुट वाढ  .

पाटण / ताः ७- (विक्रांत कांबळे )

          कोयना धरण अतंर्गत विभागासह पाटण तालुक्यातही पावसाचा जोर काहीसा कमी झाला. परिणामी धरणातील पाणी आवकही घटली आहे. सध्या प्रतिसेकंद सरासरी 34163 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.  चोवीस तासात धरणातील पाणीसाठ्यात 3.2 टि. एम. सि. ने तर पाणीउंचीत 4 फुटाने वाढ झाली आहे. धरणात आता एकूण उपलब्ध पाणीसाठा 70.29 टि. एम. सि. इतका झाला आहे . तर धरण पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे 34.71 टि. एम. सि. पाण्याची आवश्यकता आहे.

         कोयना धरण परिसरासह सर्वत्र पावसाचा जोर काहीसा कमी झाला. धरणातंर्गत विभागातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या प्रतिसेकंद सरासरी 34163    क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. येणाऱ्या पाण्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ सुरू आहे. त्याचवेळी पूर्वेकडे सिंचनासाठी पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी आता बंद केल्याने त्याचीही अप्रत्यक्ष मदत पाणीसाठा वाढीसाठी होत आहे. गुरूवार ते शुक्रवार  संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत येथे पाणीसाठ्यात 3.2 टि. एम. सि. ने पाणी तर उंचीत 4 फुटाने वाढ झाली आहे. सध्या धरणात एकूण उपलब्ध पाणीसाठा 70.29 टि. एम. सि. ,यापैकी उपयुक्त साठा 65.27 टि. एम. सि. ,पाणीउंची 2130.3 फूट, जलपातळी 649.300 मिटर इतकी झाली आहे. चोवीस तासांतील व एक जूनपासून आजपर्यंतचा एकूण पाऊस पुढीलप्रमाणे कोयना 109 मिलीमीटर ( 2607 ) , नवजा 124 मिलीमीटर ( 2864 ) , महाबळेश्वर 60   मिलीमीटर ( 2778 ), वळवण 62 मिलीमीटर ( 3458 )पावसाची नोंद झाली आहे .  

error: Content is protected !!