कोयना धरणात ६७.२७ टी एम सी पाणी साठी ;अफवांवर विश्वास नागरिकांनी ठेवू नये -कुमार पाटील

पाटण / ताः ६-प्रतिनिधी

        बुधवारच्या तुलनेत गुरूवारी कोयना धरणातंर्गत विभागासह पाटण तालुक्यातही पावसाचा जोर काहीसा कमी झाला. परिणामी धरणातील पाणी आवकही घटली आहे. धरणातुन पाणी सोडण्याचा कोणताच निर्णय झाला नसुन नागरीकानी अफवावर विश्वास ठेवु नये . असे आवाहन कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी केले आहे . सध्या प्रतिसेकंद सरासरी 58013 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. चोवीस तासात धरणातील पाणीसाठ्यात 4.35 टि. एम. सि. ने तर पाणीउंचीत पाच फुटाने वाढ झाली आहे. धरणात आता एकूण उपलब्ध पाणीसाठा 67.27 टि. एम. सि. इतका झाला आहे . धरण पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे 37.73 टि. एम. सि. पाण्याची आवश्यकता आहे.

         गुरूवारी कोयना धरण परिसरासह सर्वत्र पावसाचा जोर काहीसा कमी झाला. धरणातंर्गत विभागातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या प्रतिसेकंद सरासरी 58013 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. बुधवारी हीच आवक तब्बल प्रतिसेकंद 1 लाख 22 हजार क्युसेक्स पेक्षाही अधिक झाली होती. तथापि येणाऱ्या पाण्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ सुरू आहे. त्याचवेळी पूर्वेकडे सिंचनासाठी पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी आता बंद केल्याने त्याचीही अप्रत्यक्ष मदत पाणीसाठा वाढीसाठी होत आहे. बुधवार ते गुरूवार संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत पाणीसाठ्यात 4.35 टि. एम. सि. पाणीउंचीत पाच फुटाने वाढ झाली आहे. सध्या धरणात एकूण उपलब्ध पाणीसाठा 67.27 टि. एम. सि. ,यापैकी उपयुक्त साठा 62.27 टि. एम. सि. ,पाणीउंची 2126.10 फूट, जलपातळी 648.259 मीटर इतकी झाली आहे. चोवीस तासातील व एक जूनपासून आजपर्यंतचा एकूण पाऊस पुढीलप्रमाणे कोयना 212 मिलीमीटर ( 2498 ) , नवजा 172 मिलीमीटर ( 2740 ) , महाबळेश्वर 189 मिलीमीटर ( 2718 ), वळवण 147 मिलीमीटर ( 3396 )पावसाची नोंद झाली आहेदि. 6/8/2020

           कोयना धरणातून विसर्ग करण्याचा अध्याप कोणताच निर्णय झाला नसुन काहीजन मीडीया मध्ये कोयना धरणातुन पाणी सोडण्यात येणार असल्याच्या खोट्या अफवा पसरवत आहेत .त्यात काहीही तथ्य नाही .संध्याकाळी 6 वाजता कोयना धरणामध्ये 67.27 tmc पाणी साठा झाला आहे. धरण परिचलन सूची नुसार कोयना धरणातील पाणी साठा 80 tmc चेवर गेले नंतरच कोयना धरणातून कोयना नदी मध्ये पाण्याविसर्ग सोडण्याचा निर्णय घेतला जाईल. सध्या गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पाऊस व पाण्याची आवक कमी आहे. विसर्गाबाबत प्रशासन व प्रसार माध्यमे यांना पूर्व सूचना दिली जाईल.त्या मुळे नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवु नये . असे आवाहन कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यानी केले आहे .

error: Content is protected !!