कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी , धरणाची जलपातळीने केला सांडवा माथा पार ; धरणात ७३.५५ टीएमसी पाणीसाठा

पाटण / ता : ९ – विक्रांत कांबळे

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात रविवारी पावसाचा जोर कमी झाला असून धरणात येणारी पाण्याची आवक ही कमी झाली आहे. दरम्यान रविवारी सायंकाळ पर्यंत धरणातील पाणीसाठा ७३.५५ टीएमसी वर पोहचला आहे.
     गेल्या दोन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी होत चालला आहे . मात्र पाणलोट क्षेत्रातून येणारी पाण्याची आवक यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात हळू हळू वाढ होत आहे.रविवारी पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात प्रतिसेकंद १३ हजार ७३० क्यूसेक्स या वेगाने सुरू असल्याने सायंकाळी पाच पर्यंत  धरणात ७३.५५ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

संग्रहीत छायाचित्र

    दरम्यान धरणातील सद्याची जलपातळी ही धरणाच्या सहा वक्रद्वार म्हणजेच सांडवा माथा पार करून पुढे सरकली  असून या जलपातळीने  निर्धारित पाणी पातळीही पार केली आहे.मात्र धरण परिचालन सूची नुसार धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी  सध्या तरी पाणलोट क्षेत्रात पावसाचा म्हणावा तसा जोर नाही . परिणामी पाण्याची आवक ही त्या प्रमाणात कमी आहे . त्यामुळे धरणातून पाण्याचा  विसर्ग करण्याच्या सद्या तरी शक्यता नाही . मात्र पावसाचा जोर वाढल्यास कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग सुरू करून पाणीपातळी नितंत्रित करावी लागेल . अशी माहिती कोयना जलसिंचन विभागाने दिली.
    दरम्यान रविवारी सकाळी आठ वाजे पर्यत चोवीस तासांत कोयनानगर येथे  ४४ (२७०५)मिलिमीटर,नवजा  २५(२९५९) मिलिमीटर,महाबळेश्वर  ४८ (२८९६) आणि वाळवण ३३ (३५७०)मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

error: Content is protected !!