पाटण / प्रतिनिधी
कोयना परिसरात दि. 1 सप्टेंबर रोजी सकाळी 2.6 रिष्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने हादरला होता. आज एक आठवड्यानंतर (दि. 7) रोजी पुन्हा सकाळी 7.55 वाजता 2.6 रिष्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का या परिसरात जाणवला. दरम्यान, दोन्ही भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता समान असून याचा धरणाच्या सुरक्षिततेला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा धरण व्यवस्थापणाने दिला आहे.
कोयना परिसरात सोमवारी सकाळी 7.55 वाजता भूकंपचा धक्का बसला. त्याची तीव्रता रिष्टर स्केलवर 2.6 इतकी नोंद झाली असून या भूकंपाचा केंद्रबिंदू काडोली, (ता. पाटण ) गावापासून आग्नेयेस 6 किलोमीटर व कोयनानगर पासून 14.4 किलोमीटर अंतरावर होता. तसेच भूकंपाच्या केंद्रबिंदूची खोली 5 किलोमीटर होती. मात्र या धक्क्यामुळे कोयना धरणाला कोणताही धोका नसून धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा कोयना व्यवस्थापन सूत्रांकडून देण्यात आला.