कोयना परिसरात आज सकाळी भूकंप ; अतिसौम्य तिव्रता

पाटण / ता. १- प्रतिनिधी

      कोयना परिसरात आज सकाळी ७-१६ वाजता भूकंप झाला आहे. भूकंप २.६ रिश्‍टर ( महत्ता ) स्केलचा असून त्याची तीव्रता सौम्य आहे . भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनेपासून पासून आठ किलोमीटर अंतरावर व चिपळूण तालुक्यातील अलोरे गावच्या दक्षिण दिशेला सहा किलोमीटर अंतरावर आहे . हा भूकंप फक्त कोयना परिसरात जाणवला . भूकंपाच्या केंद्रबिंदूची खोली चार किलोमीटर आहे. अशी माहिती कोयनानगर उपकरण विभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी कळविली आहे .

error: Content is protected !!