क्रांतिसिंहांच्या त्यागाची आठवण सर्वांनी ठेवूया – वैभव नायकवडी

इस्लामपूर /ताः ३-जितेंद्र पाटील

     क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर केलेल्या त्यागाची आठवण आपण सर्वांनी ठेवूया. असे प्रतिपादन हुतात्मा उद्योग समूहाचे प्रमुख वैभव नायकवडी यांनी केले. वाळवा येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त हुतात्मा किसन अहीर विद्यालयाच्या मैदानावरील पूणार्कृती पुतळ्याला अभिवादन करताना ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे संचालक शिवाजी अहीर, शाळेचे मुख्याध्यापक मधुकर वायदंडे, जिजामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्याताई चेंडके, पर्यवेक्षक एस खणदाळे सर्व शिक्षक आणि शिक्षिका आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

      येथे हुतात्मा विद्यालयाच्या प्रांगणातील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याला अभिवादन करताना वैभव नायकवडी व हुतात्मा संकुलातील पदाधिकारी मान्यवर

          वैभव नायकवडी म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांची खरी कर्मभूमी म्हणजे वाळवा गाव . क्रांतिसिंह नाना पाटील यांनी इथे रुजवलेला विचार आजही पद्मभुषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कर्तृत्वाच्या रूपाने जपला जात आहे, वाळवा गाव ब्रिटिशांच्या लढ्यामध्ये सर्वात अग्रभागी होते, नाना पाटील यांचे वास्तव्य देखील वाळवा गावात अखेरपर्यंत होते, त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील मोठ्या संघर्षमय वातावरणामध्ये वाळवा येथे करण्यात आले . त्यामुळे वाळव्यातली भूमी नव्या पिढीला सतत प्रेरणा देत आहे. या भूमीमध्ये अनेक चळवळी उभ्या राहिल्या . साहीत्य क्रिडा क्षेत्र असो अथवा सहकार, चळवळींच्या क्षेत्रात कायम वाळवा गावाचे नाव कर्तुत्वामध्ये सतत उंचच राहिलेले आहे . शेतकरी, कामगार, कष्टकरी जनतेला सुखी करण्याचा मंत्र क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आपल्याला दिला आहे . तो आपण वाढवूया . नव्या पिढीने तो आत्मसात करावा.
         दरम्यान हुतात्मा साखर कारखाना कार्यस्थळावर अतिथीगृहावर कारखान्याचे कार्यकारी संचालक अजित देशमुख, प्रसिद्धी अधिकारी शिवाजी पाटील, विजय मुसळे – पवार, कामगार अधिकारी ए.डी. माळी, साखर विभागाचे रामचंद्र कदम, संगणक विभागाचे एस.ए. पाटील, शेती अधिकारी ए.पी. चव्हाण, पोपट कदम आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!