कुंभोजच्या युवकाच कुभोज ते बागेश्वरधाम पर्यंत सायकल प्रवास

हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील मिलिंद श्रीपती भोसले हे दिनांक ९ डिसेंबर रोजी कुंभोज (महाराष्ट्र )येथून मध्य प्रदेश येथल श्री बालाजी बागेश्वर धाम सरकार यांच्या दर्शनासाठी सायकलवरून रवाना झाले. सदर प्रवासासाठी शुभेच्छा देण्यासाठी कुंभोज बस स्थानक परिसरामध्ये गावातील विविध तरुण मंडळ हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व भोसले यांचे हितचिंतक उपस्थित होते. यावेळी भोसले यांना सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कुंभोज महाराष्ट्र ते मध्य प्रदेश श्री बालाजी बागेश्वर धाम सरकार इथपर्यंत सायकलने प्रवास करणारे कोल्हापूर जिल्ह्यातील मिलिंद भोसले हे पहिलेच व्यक्ती असून त्यांनी आठ नऊ महिन्यांपूर्वी सायकलने प्रवास करीत श्री बालाजी बागेश्वर धाम यांचे दर्शन घेतले होते.

मिलिंद भोसले हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहेत. मिलिंद हे रोजंदारीवर काम करत असून त्यांची घरची परिस्थिती बेताची आहे. परंतु हनुमान जी व श्री बालाजी बागेश्वर धाम सरकार यांच्यावर असणाऱ्या निस्सीम भक्ती व प्रेमामुळे लाख अडचणींवर मात करून ते हा प्रवास करत असतात. बागेश्वर धाम सरकार हे वेगवेगळ्या रूपात माझी मदत करत असतात तसेच त्यांच्यावर असणारा माझा विश्वास व श्रद्धा दिवसेंदिवस वाढत असून मी ज्या ज्या वेळेला दर्शनासाठी जाईल त्या त्या वेळेला सायकलनेच प्रवास करण्याची इच्छा आहे. तसेच माझा चालू प्रवास हा 20 ते 25 दिवसांचा असून एक जानेवारी रोजी धीरेंद्र जी शास्त्री महाराजांचे दर्शन होईल. असे मत मिलिंद भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!