हातकणंगले /ता : ३०
कुंभोज-दानोळी मार्गावर पुजारी किराणा दुकाना समोर कुंभोज गावच्या हद्दीत हातकणंगले पोलिसांनी अवैध गुटखा विकताना सुदर्शन रंगराव पुजारी ( वय -30 वर्ष .रा. कुंभोज ) याला पकडून गुन्हा दाखल केला आहे . त्याच्याकडून पल्सर मोटरसायकलसह 18325/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . दुसऱ्या एका कारवाईत देवमोरे मेडिकल समोर अवैध गुटखा विक्री करताना सुभाष बाबासो शिंदे (वय- 40 रा . कुंभोज ) याच्याकडे अवैध गुटखा पकडून गुन्हा दाखल केला आहे . त्याच्याकडून सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . ही कारवाई उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय युवराज सूर्यवंशी यांच्यासह भिमराव धोत्रे , दिग्विजय देसाई , प्रांजल कांबळे , राकेश इंदुलकर , सुहास गायकवाड , भूषण शेटे कोडलकर ,बाणदार , पाडवी यांनी केली आहे .