विधान,भक्ती, पूजन यामुळे जीवांना पुण्य लाभेल – ग. ग. कुंथुसागरजी महाराज

त्रैलोक्य आराधनामध्ये तीन लोकातील कृत्रिम अकृत्रिम जिनालयाचे पूजन करण्यात येते. आपण सर्व जीव आता पंचम काळात जन्माला आलो आहोत. संसाराच्या ह्या परिक्रमामध्ये अशा विधान, पूजा, भक्तीमुळे पुण्या लाभ करून घ्यावे लागेल. सर्वांचे पुण्योदोय झाल्यामुळे आपण सर्व जीवांना या त्रैलोक्य आराधनात उपस्थित राहता आले, असे प्रतिपादन पूज्य गणाधिपती गणधराचार्य कुंथुसागरजी महाराज (Kunthusagarji Maharaj) यांनी केले. ते येथील श्री १००८ भगवान चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरमध्ये श्री त्रैलोक्य महामंडल आराधना महामहोत्सवात विशेष प्रवचनात बोलत होते.

सकाळी सुप्रभात झाले, यावेळी गणाधिपती गणधराचार्य कुंथुसागरजी महाराज यांचे सवाद्य, पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर सौधर्म इंद्र मिरवणूकीने आगमन, विश्वशांती महायज्ञ, भगवंतावर अभिषेक झाले. त्यानंतर अरुण दत्तवाडे यांनी हत्तीवरुन जलकुंभ आणले. त्यानंतर त्रैलोक्य आराधना विधान झाले. यामध्ये १४० बिजाक्षरे अर्घ्य, ७ अष्टके, ७ जयमाला, १५ पूर्णाध्य झाले. त्यानंतर शीतल उपाध्ये यांच्या हस्ते हत्तीवरुन विधानमंडलावर पुष्पवृष्टी करण्यात आली. सायंकाळी प्रीतम चौगुले हत्तीवरुन जिनवाणी शास्त्राची मिरवणूकीचा मान मिळविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!