सरसकट वैद्यकीय बिल मंजुर करावीत ; शिक्षक नेते दादासाहेब लाड यांची मागणी

हेरले /ता : १४

          सन २०१८ – १९ व २०१९ – २० या आर्थिक वर्षातील शासकीय -निमशासकीय कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले कोरोनाच्या काळात सरसकट मंजूर करावीत . यासह अन्य मागण्यांचे निवेदन आरोग्यमंत्री नाम . राजेंद्र पाटील ( यड्रावकर ) यांना शिक्षक भारती संघटनेचे पुणे विभागाचे अध्यक्ष व शिक्षकनेते दादासाहेब लाड ,पगारदार पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मनोहर पाटील , अध्यक्ष सुनिल पाटील यांनी दिले .
           यावेळी पांढऱ्या रेशनकार्ड धारकांचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत केलेबद्दल नाम . पाटील यांचे आभार मानले . नाम . पाटील यांनी शासन दरबारी वैद्यकीय बिलाबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले .

नाम . राजेंद्र पाटील -यड्रावकर यांना निवेदन देताना शिक्षकनेते दादासाहेब लाड, मनोहर पाटील , सुनिल पाटील.

error: Content is protected !!