लक्ष्मीवाडी उपसरपंचपदी किरण खोत यांची निवड

उपसरपंच किरण खोत यांचा सत्कार करताना मान्यवर

हातकणंगले / ता: १५

         लक्ष्मीवाडी (ता . हातकणंगले ) गावच्या उपसरपंचपदी किरण आनंदा खोत यांची बिनविरोध निवड झाली . बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच रामदास हांडे होते . सातही सदस्य शिवसेनेचे असुन आघाडीत ठरल्याप्रमाणे प्रभू शंकर झलक यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागी किरण खोत यांची बिनविरोध निवड झाली . यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य , सदस्या तलाठी प्रमोद पाटील ,ग्रामसेवक ग्रामसेविका आशिया पटेल ,पोलीस पाटील रियाज मुजावर , दिलीप हांडे ,बाळू खोत , कृष्णा खोत , ग्रामसुरक्षा दल अध्यक्ष दादासो खोत , तंटामुक्त अध्यक्ष सर्जेराव खोत , महादेव हांडे ,मधुकर हांडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते .

error: Content is protected !!