मुंबईतील प्रसिद्ध मंडळाला महापालिकेने ठोठावला 3 लाख 66 हजारांचा दंड

MSK online news

   मुंबईतील लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) मंडळाला मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) दणका दिला आहे. मुंबईत गणेशोत्सवादरम्यान लालबागचा राजा मंडळाकडून रस्ते आणि पदपथांवर खड्डे  खोदण्यात आले होते, त्यासाठी मुंबई महापालिकेने लालबागचा राजा मंडळाला हा दंड (Fine) ठोठावला आहे.

संग्रहित छायाचित्र

लाकडी खांब बसवण्यासाठी पदपथावर 53 आणि रस्त्यावर 150 खड्डे खोदण्यात आले. यासाठी महापालिकेने लालबागचा राजा मंडळाला  3 लाख 66 हजारांचा दंड ठोठावला आहे. मुंबई महापालिका रस्त्यावर करण्यात येणाऱ्या खड्यांसाठी सर्वच गणेशोत्सव मंडळाला अशा प्रकारचा दंड ठोठावते.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळाकडून अनेक ठिकाणी खड्डे पाडले जातात. गणेशोत्सव संपल्यावर नियमाप्रमाणे खड्डे बुजवण्याची जबाबदारी मंडळावर सोपवली आहे. मात्र लालबागचा राजा मंडळाकडून खड्डे बुजवण्यात आले नाहीत. मंडळाने सन 2022 मध्ये 203 खड्डे खोदले होते. हे खड्डे वेळीच बुजवले नसल्याने पालिकेने मंडळाला 3 लाख 66 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

error: Content is protected !!