इचलकरंजीत सातपुते उद्योग समुहातर्फे पतंजली मेगा स्टोअर्सचा शुभारंभ

भारतीय संस्कृतीमध्ये वर्षानुवर्षे हजारो वर्षांपासून आपल्याकडे आयुर्वेदाच्या साहाय्याने आजारांवर उपचार करण्याची परंपरा आहे. हल्ली पाश्‍चिमात्य देशातही आयुर्वेद उपचार पध्दतीचा अवलंब केला जात आहे. काळाचा ओघ ओळखून इचलकरंजी येथील सातपुते उद्योग समुहाच्या वतीने पतंजली मेगा स्टोअर्स ’अमृतकलश औषधालय’ सुरु करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ करवीर पीठाचे प.पू. जगद्गुरु शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांचे प्रमुख उपस्थितीत आणि पतंजलीचे पश्‍चिम महाराष्ट्राचे राज्य प्रभारी चंद्रशेखर खापणे यांच्या हस्ते आणि तसेच विजय पोवार, रविकुमार शर्मा, सौ. सुनंदा काबरा यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
याप्रसंगी शंकराचार्यांनी आयुर्वेदावर व आधुनिक जीवन शैलीवर आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रकाशराव सातपुते, शामराव कुलकर्णी, उदय बुगड, शैलेश सातपुते, प्रकाश दत्तवाडे, डि. एम. बिरादार, काशिनाथ जगदाळे, महावीर कुरूंदवाडे, विलास गाताडे, गजाननराव होगाडे, इरगोंड पाटील, अरूण खंजिरे, अजित कोईक, प्रमोद मुसळे, प्रशांत सपाटे, नरसिंह पारीक, शिवबसु खोत, मुकुंद पोवार आदींसह मान्यवर उपस्थित होते. तसेच सातपुते परिवारातील राहुल सातपुते, अमोल सातपुते, शामल सातपुते, शितल सातपुते, अनिल सातपुते, संजय सातपुते, सुनिल सातपुते उपस्थित होते.

error: Content is protected !!