जाणून घ्या एप्रिल फूल मागचा मजेशीर किस्सा

   कोणाचीही गंमत करणे, मस्करी करणे, मिश्किलपणे फसवणे हा आनंदाचाच एक भाग आहे. आणि 1 एप्रिल (1st April) हा दिवस याच गोष्टींसाठी बनला आहे असं म्हणायला हरकत नाही. या दिवशी लोक एकमेकांसोबत थट्टा मस्करी (pranks, jokes) करतात, एकमेकांना फसवतात. तरूणांमधे हा उत्साह अधिक असतो. पण हा दिवस कसा निर्माण झाला (why April fool is celebrated) यामागे नक्की काय कारण आहे हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घेऊया नक्की काय घडलं होतं त्यावेळी. या दिवसाचा संबंध थेट 1582 मधे घडलेल्या एका घटनेशी आहे.

   सर्वसामान्यांसाठी थोडी खुशी थोडा गम; 1 एप्रिलपासून तुमच्या खिशावर परिणाम करणारे 8 बदल ही घटना 1582 ची फ्रान्स (France) मधील आहे. त्यावेळी फ्रान्स ज्युलियन कॅलेंडर (Julian calendar) मधून ग्रेगोरियन कॅलेंडर (Gregorian calendar) मध्ये विस्थापित होत होतं. फ्रान्सला हे नवीन वर्ष वसंत विषुववृत्तात साजरं करायचं होतं आणि तो दिवस होता 1 एप्रिल. पण नागरिकांना (citizens of France) यामागील योजना समजली नाही आणि ते 1 एप्रिललाच नवीव वर्ष समजू लागले. तेव्हा फ्रान्सचे जवळपास सगळेच नागरिक हे फूल म्हणजेच वेडे ठरले होते. त्यांनी स्वताचीच फसवणूक गमतीशीररित्या केली होती आणि तेव्हापासूनच एप्रिल फूल हा दिवस गंमतीसाठी (pranks) साजरा केला जातो.

संग्रहित माहिती 

संदर्भ news18 लोकमत

error: Content is protected !!