दिनेश कुलकर्णी, संजय होगाडेंना जीवन गौरव

मुद्रण व्यवसायातील योगदानासाठी दिला जाणारा ‘जीवन गौरव पुरस्कार’ यावर्षी रचना प्रिंटर्सचे दिनेश कुलकर्णी व संजय होगाडे यांना प्रदान केला. प्रिंटर्स असोसिएशनचा स्नेहमेळावा व जीवन गौरव पुरस्कार वितरण झाले. मुद्रणक्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा व मुद्रण क्षेत्रात कार्यरत झालेल्या नव तरुणांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव केला.
खासदार धैर्यशील माने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रकाश ऑफसेटचे अरुण खंजिरे होते. मुद्रकांना भविष्यामध्ये चांगले दिवस नक्कीच येतील. त्यासाठी मुद्रकांनी नेहमीच सज्ज असले पाहिजे, असे मत खंजिरे यांनी व्यक्त केले. मुद्रकांसाठी मुद्रण साहित्याचे विविध स्टॉल्स उभारले होते. वेशभूषाकार संजय काशीद यांनी मुद्रण कलेचे जनक जोहानेस गुटेनबर्ग यांची वेशभूषा परिधान केली होती. शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, नागेश शेंडगे (सोलापूर), हार्दिक सातिया (हुबळी), प्रसाद कबाडे, अनिल मोहिते (कोल्हापूर) आदी उपस्थित होते. प्रिंटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सीताराम शिंदे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष संजय निकम यांनी स्वागत केले. नरेंद्र हरवंदे यांनी परिचय करून दिला.

error: Content is protected !!