रुकडीतील अपघातग्रस्त शेतकऱ्याला जीवदान

रुकडी, ता. हातकणंगले येथील दादासाहेब तातोबा खोत या वयोवृद्ध शेतकऱ्याचा पहाटे तीनच्या सुमारास अपघात झाला होता. यावेळी उपसरपंच शितल खोत आणि सामाजिक कार्यकर्ते साहिल कलावंत यांनी संवेदनशिलता दाखवत त्यांना तातडीने उपचारासाठी डॉ. विजय पवार यांच्याकडे दाखल केले. यामुळे त्यांचा जीव वाचला. याबद्दल या दोघांचे रुकडी ग्रामस्थांतून कौतुक होत आहे.
याबाबत हकीकत अशी की, पहाटे तीनच्या सुमारास दादासो खोत हे मोटरसायकलवरुन शेताकडे जात होते. लोकनेते बाळासाहेब माने पुतळ्याजवळ त्यांची गाडी स्लिप होऊन अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले. याचवेळी साहिल कलावंत हे बहिणीला आणण्यासाठी शिरोलीकडे जात होते. रक्तबंबाळ अवस्थेत खोत पडल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी तात्काळ उपसरपंच शितल खोत यांना फोनवरुन माहिती देत, त्यांना बोलवून घेतले. आणि उपचारासाठी साईनाथ हॉस्पिटलचे डॉ. विजय पवार यांच्याकडे दाखल केले. परंतु नाका, तोंडातून अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांना ताबडतोब जयसिंगपूर येथील पायोस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती सुधारत आहे.

error: Content is protected !!