जयसिंगपुरात 17 रोजी लिंगायत समाजाचा राज्य वधू-वर पालक परिचय मेळावा

जयसिंगपूर : येथील लिंगायत समाजाच्यावतीने रविवार 17 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता येथील दि मर्चंट असोसिएशन हॉलमध्ये राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचे लग्न योग्य वधू तसेच मुलीला यीग्या वर मिळावा , अशी इच्छा असते. पण दैनंदिन व्यवहारातील अडचणी व प्रसंगातून जातअसताना स्थळांची योग्य माहिती उपलब्ध होत नाही मुला-मुलींसाठी योग्य स्थळ शोधण्यासाठी प्रत्येक पालकाला दिव्य प्रसंगातून जावे लागते यासाठी लिंगायत समाजाच्यावतीने वधू-वर पालक मेळावा आयोजन केला आहे. मेळाव्यास वधू-वरांसह पालकांनी उपस्थित राहावे , असे आवाहन संयोजकांनी केले आहे. वधू-वर नोंदणीसाठीयेथील श्री महात्मा बसवेश्वर पतसंस्था गल्ली नंबर 12 जयसिंगपूर अथवा शैलेश आडके ,शहापूर ,जयसिंगपूर आणि शिवानंद आरळी कचरे सोसायटी यांच्याकडे नोंदणी करावी .

error: Content is protected !!