हातकणंगलेत ४१ हजारांचा मद्यसाठा जप्त

हातकणंगले : प्रतिनिधी

हातकणंगले पोलिस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना देशी व विदेशी मद्य विक्री करताना राजकुमार अशोक घाटकर (वय ४८, रा. तारदाळ) याला हातकणंगले पोलिस ठाण्याच्या दारू बंदी पथकाने पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून ४१ हजार ८०६ रुपयांचा मद्य साठा जप्त केला. त्याच्यावर हातकणंगले पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. घाटकर याच्या विरोधात विविध प्रकारचे ११ गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलिस निरीक्षक महादेव तोंदले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल अतुल निकम, पोलिस कॉन्स्टेबल गायकवाड, पाटील यांनी ही कारवाई केली.

error: Content is protected !!