७ लाख ८४ हजारांची दारू जप्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच अवैद्य अंमली पदार्थ आणि मद्य वाहतूक करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करडी नजर ठेवण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने चंदगड तालुक्यातील ढेकोळी येथे कारवाई करत गोवा बनावटीच्या मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या संजय नाईक याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक लाख ४४ हजार रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेलं वाहन असा ७ लाख ८४ हजार २२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

error: Content is protected !!