मविआतील लोकसभेच्या दोन महत्त्वाच्या जागांवर तिढा सुटला

  लोकसभेच्या (Lok Sabha Elections) जागावाटपावरून महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात चढाओढ सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे या दोन्ही पक्षांना मागील लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या आपल्या काही जागा सोडाव्या लागणार आहे. मतदारसंघातील स्थिती लक्षात घेऊन ती जागा कोणाला मिळणार, याचे सूत्र ठरवावं, यावर तीनही पक्षांचं एकमत झालं आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव आणि कोल्हापूरच्या जागेबाबत मविआकडून कोण लढणार, यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. जळगावची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला तर कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्याचे निश्चित झाल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसची कोल्हापूर जिल्ह्यातील ताकद लक्षात घेत महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ आपल्याला मिळावा, यासाठी काँग्रेस नेते आग्रही होते. त्यामुळे ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली असून त्याबदल्यात सांगलीची जागा काँग्रेसकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिली जाणार आहे. तर जळगावची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिली जाणार असून मशाल चिन्हावर हर्षल माने हे मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

error: Content is protected !!