शिक्षण माणसाला यशाच्या शिखरावर पोहोचवते -एम टी कांबळे

चंदगड /ता.२०- प्रतिनिधी

    शिक्षण माणसाला यशाच्या शिखरावर पोहोचवते . असे उद्घगार चंदगड पंचायत समितीचे नवनियुक्त शिक्षण विस्ताराधिकारी श्री एम. टी. कांबळे यांनी काढले. धनंजय विद्यालय व ज्युनियर कॉलेज नागनवाडी,तालुका चंदगड येथे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आयोजित केला होता . त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री एस एस देवरमनी होते.
        यावेळी बोलताना श्री. एम. टी कांबळे यांनी धनंजय विद्यालय व ज्युनियर कॉलेज च्या गुणवत्ता व इतर उपक्रमांबद्दल गौरव उद्गार काढले. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या आत्तापर्यंतच्या सेवेतील प्रवास विशद केला आणि सत्कार केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रास्ताविक श्री. एच. आर. पाऊसकर यांनी केले, आभार श्री सपताळे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!