बालाजी सोशल फौंडेशनतर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन

हृदयविकार, मूत्र विकार, डोळयांचे विकार, हाडांचे बालाजी सोशल फौंडेशन, अलायन्स हॉस्पिटल, विकार, स्त्रियांचे विकार, कॅन्सर लक्षणे तपासणी व जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि टेके आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील नागरिकांसाठी रविवार दि.१० व सोमवार दि.११ मार्च रोजी बालाजी माध्यमिक विद्यालय, विक्रमनगर इचलकरंजी येथे मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित केले असल्याची माहिती संस्थापक मदन कारंडे यांनी दिली.
शिबीरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गरज पडल्यास मोफत चष्मे आणि सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात व येणार आहेत. सदर शिबीराचा लाभ जास्तीत जास्त लोकांना घ्यावा असे आवाहन श्री कारंडे यांनी यावेळी केले. यावेळी मदन गोरे, रामदास कोळी, मंगेश कंबूरे, मच्छिंद्र नगारे, विजय बाबर, माधुरी सातपुते, गणेश सावरतकर, प्रकाश माने उपस्थित होते.

error: Content is protected !!