महाडीक अभियांत्रिकीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वेबिनार

इस्लामपूर /ताः १ जितेंद्र पाटील

        श्री . व्यंकटेश्वरा शिक्षण संस्था संचलित नानासाहेब महाडिक कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग मध्ये मेकॅनिकल विभागाच्या वतीने स्पर्धा परीक्षांचा यशस्वी मूलमंत्र या विषयावर आॅनलाईन वेबिनार संपन्न झाला. या कार्यक्रमात अभियांत्रिकी शाखेचे १२७ विद्यार्थ्यी सहभागी झाले. स्पर्धा परीक्षा केंद्राचे संस्थापक वैभव पाटील यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग नंतर असणा-या प्रशासकीय सेवा व संधी या विषयावर आॅनलाईन माहिती सादर केली. वेबिनारमध्ये संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा.महेश जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

महाविद्यालयाच्या करिअर अँड इंटर्प्रिनरशिप डेव्हलपमेंट सेल या विभागाच्या अंतर्गत हा वेबिनार संपन्न झाला. सर्वत्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शाळा व महाविद्यालयांना सुट्टी आहे. सदरच्या काळात नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालय विविध आॅनलाईन उपक्रमांच्या माध्यमातून सक्रिय आहे. स्पर्धा परीक्षांमधून अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर यशस्वी होऊन प्रशासकीय सेवेत दाखल होत आहेत. या वेबिनार च्या माध्यमातून एमपीएससी,यूपीएससी या परीक्षांच्या स्वरूपाबरोबरच विविध बँकिंगच्या परीक्षांविषयी मार्गदर्शन करण्यात आले . महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी करिअरची संधी उपलब्ध व्हावी . या उद्देशाने या वेबिनारचे आयोजन करण्यात आले असून सहभागी विद्यार्थ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल . अशी माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा.श्री.महेश जोशी यांनी दिली.

        विद्यार्थी व पालकांच्या आग्रहास्तव एक महिन्याचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे. उपप्राचार्य प्रा.निलेश साने, विभाग प्रमुख प्रा.दत्तात्रय पाटील,समन्वयक प्रा.रुपेश फोंडे यांच्यासह मेकॅनिकल विभागातील स्टाफ यांनी संयोजन केले.

error: Content is protected !!