नेताजी पालकर गोविंदा पथकाने फोडली युवा शक्तीची दहिहांडी

    पश्चिम महराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून ओळख असलेली महाडिक युवा शक्तीचा दहिहांडी (Mahadik Yuva Shakti Dahihandi) गडहिंग्लजच्या (Gadhinglaj) नेताजी पालकर व्यायामशाळा गोविंदा पथकाने (Netaji Palkar Govinda Team) ७ थर रचत दहीहांडी फोडली. माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या हस्ते गोविंदा पथकाला ३ लाखाचे पारितोषिक देण्यात आले. तसेच सर्वात वरच्या थरावर जावून हांडी फोडणारे प्रकाश मोरे यांना ५१ हजार रुपयांचे अमरेंद्र पृथ्वीराज महाडिक पारितोषिक देण्यात आले.

दसरा चौक मैदानात हा सोहळा पार पडला. सुरुवातीला गोविंदा पथकांनी ६ ते ७ थरांचे मनोरे रचून सलामी दिली. विजय टिपुगडे, राजेंद्र बनसोडे, विनायक सुतार, अनंत यादव, इंद्रजीत जाधव, उत्तम पाटील यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते.

error: Content is protected !!